पुणे – बृहन्मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची पुण्याचे सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक पदाच्या दर्जावरुन विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्याकरीताच्या प्रक्रियेतुन कर्णिक यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर विद्यमान सहपोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांची मुंबईच्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. गृह विभागाचे सहसचिव वेंकटेश भट यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले.
संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता.. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती.त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचे ते जावई आहे.