पुणे – मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे अवाहन करण्यात येत आहे. यासंबंधी गणेश मंडळ, लोक प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकार्यांची नुकतीच बैठक पार पडली. त्याच धर्तीवर उत्सवा दरम्यान नागरिकांसाठी पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी आचरसंहिता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे सर्वांचे एकमत झाले आहे. त्यानूसार पोलिस आयुक्तालयाने आचारसंहिता जाहीर केली आहे.
प्रतिष्ठापना आणि दर्शन
गणेश मुर्ती खरेदी मंडळांनी व नागरिकांनी ऑनलाईन पध्दतीने करावी. श्रींचे आगमन व विसर्जनाच्या वेळी कमीत कमी लोक एकत्र जमतील, तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. ज्या मंडळांची मंदिरे आहेत, त्यांनी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मंदीरात करावी. अनन्य साधारण परिस्थितीत छोट्या मंडपांना परवानगी देण्यात येणार. श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी. ऑनलाईन टोकण , डिजीटल पास सुविधा देताना वेळेची मर्यादा ठेवावी लागणार आहे. तर फुले, मिठाई आदींचे स्टॉल लावण्यास मनाई आहे. रुग्णवाहिका, रिक्षा व इतर वाहने जाण्याकरीता आवश्यक तेवढी मोकळी जागा ठेवावी. सॅनिटायझेशन करीता विविध साधणे मंडळांनी ठेवावीत. कोणत्याही व्हिआयपी व्यक्तींना आमंत्रीत करणे टाळावे.
पुजा
श्री गणेशाची पुजा व आरतीसाठी जास्ती-जास्त पाच व्यक्ती हजर असतील. यावेळी सोशल डिस्टंन्ससिंग, मास्क वापरने अनिवार्य, गर्दी होतील असे उपक्रम टाळावेत. परिस्थीती लक्षात घेत आरती व पुजन मंडळाचे कार्यकर्ते व पुजार्यांनीच करावी.
श्री विसर्जन
श्रींचे विसर्जन मंडळालगतच विधिवत करावे, मिरवणूक काढता येणार नाही. महापालिका विसर्जन घाट व हौदांची व्यवस्था करणार नाही. अन्नदान आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांना गर्दी टाळण्याकरीता मनाई आहे. आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. गणेश मुर्ती आणि निर्माल्य महापालिकेने घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. लहान मुले व जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विसर्जनस्थळी जाणे टाळावे. सोसायट्यांमध्ये कृत्रिम हौद तयार करून घरगुती गणपतीचे विसर्जन तेथेच करण्याचे आवाहन करण्यात यावे.
सुरक्षेची घ्यावी लागणार काळजी
संशयीत किंवा बेवारस वस्तू आढळून आल्यास ताबडतोब पोलिसांना खबर द्यावी. मौल्यवान दागिने असणार्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीच्या मुर्तीचे रक्षणाकरीता कमीत कमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजार असावेत. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क यावा याची खबरदारी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अटी व नियमांचे काटेखोर पालन करावे.
नांगरिकांनी गणेश मुर्ती खरेदी ऑनलाइन करावी, पालिकेकडून शाळांची पटांगणे, मोकळ्या जागेवर गणेश मुर्ती विक्रीकरीता परवानगी देण्यात येणार आहे. पदपथावर विक्रीसाठी परवानगी दिली जाणार नाही. गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फुट उंचीची मूर्ती तर घरगुती गणपतीची मुर्ती 2 फुटापर्यंत असावी. श्री च्या आरतीला जास्तीत जास्त पाच व्यक्ती उपस्थित राहतील यावेळी सॅनिटायझर, मास्क व शोशल डिस्टसिंग पाळावे. गर्दी होईल असे उपक्रम टाळावे.