पुणे – पादचारी तरुणाला धमकावून मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच चोरुन नेल्याची घटना मंडईतील रामेश्वर चौकात घडली. याबाबत विल्सन जोसेफ अमेर (२५, रा. गणेशनगर, एरंडवणे) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विल्सन पहाटे तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन निघाला होता.
रामेश्वर चौकात मोटारीतून आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले. विल्सनला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील २२ हजारांचा मोबाइल संच चोरून नेला. पोलिसांनी रामेश्वर चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बरुरे करत आहेत.