गंगाराम मातेरे ः दारवली येथे सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन
पौड – मुळशीच्या विकासात आमदार संग्राम थोपटे यांचे मोठे योगदान आहे. पुढील काळातही संग्राम थोपटे यांचे योगदान असेच राहणार आहे. गावागावात व वाड्या-वस्त्यांमध्ये मोठी विकास कामे होत राहणार आहेत, असे प्रतिपादन मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी केले.
दारवली (ता. मुळशी) येथे आमदार थोपटेंच्या विकास निधीतून दहा लाख रुपयांच्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन गंगाराम मातेरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी दारवलीत साकव पूल, मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ता, अंगणवाडी इमारत व विविध विकासकामे आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून व प्रयत्नांतून झालेली आहेत. पौड ते दारवली या रस्त्यासाठी आता निधी उपलब्ध झाला असून,
भरे फाटा ते दारवली या रस्त्यासाठीदेखील रस्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरण (पीएमआरडीए) च्या माध्यमातून व आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून पावसाळ्याच्या आधी या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा निकिता सणस, महिला कार्याध्यक्ष सविता गवारे, रमेश सणस,
जवळगावचे माजी सरपंच विलास केमसे, भोर विधानसभा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अभिषेक पारखी, पौडचे माजी सरपंच अजय कडू, किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप हुलावळे, सौरभ गोळे, रामदास साठे, अंकुश साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते मधुकर भिंगारदिवे, शाखा अभियंता विक्रांत करंबाळे, सरपंच नरेश बलकवडे,
उपसरपंच पूजा धनवे, ग्रामसेवक हनुमंत भंडलकर, माजी उपसरपंच गणेश धनवे, स्वप्निल सणस, साईनाथ धनवे, धनंजय भिलारे, ज्ञानोबा धनवे, यशवंत धनवे, अक्षय कानगुडे, नागेश धनवे, जितेंद्र बलकवडे, तुषार धनवे, स्वप्नील धनवे, संकेत धनवे, रोहित धनवे, बबन धनवे, मारुती धनवे, आदेश धनवे, वैभव धनवे, अविनाश धनवे, बाळू धनवे, रामभाऊ धनवे, मनोहर धनवे आदी उपस्थित होते.