पुणे – एकदाही मूल्यांकन न झालेल्या शाळांना अनुदानाची संधी

पुणे – एकदाही मूल्यांकन न झालेल्या विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांनी येत्या 26 एप्रिलपर्यंत ऑफलाइन मूल्यांकन प्रस्ताव सादर करा, असा सूचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. गणपत मोरे यांनी पुणे जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

अनुदानासाठी विनाअनुदानित शाळांचे सन 2014-15 मध्ये मूल्यांकन करण्यात आले होते. सन 2013-14 यावर्षी वयानुसार मूल्यांकनासाठी पात्र नसणाऱ्या शाळा व तुकड्यांचे अनुदानाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात आले नव्हते. मात्र, आताच्या स्थितीला या शाळांच्या तुकड्या वयानुसार पात्र ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत.

शासन निकषानुसार स्वयंमूल्यमापन करून प्राप्त होणारे गुण नमूद करून तपासणी सूचीप्रमाणे आवश्‍यक त्या कागदपत्रांसह शाळांना प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. शाळांमधील इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालये, स्वच्छतागृह पिण्याचे पाणी, संगणक कक्ष या भौतिक सुविधा, वर्गाची हजेरी, परीक्षांचे निकाल, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण मुलींचे प्रमाण, गळतीचे प्रमाण, शिक्षकांची शैक्षणिक क्षमता वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन, नियुक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांची यादी, शिक्षण उपसंचालकांची तुकडी मान्यता आदींसह इतर विविध कागदपत्र प्रस्तावासोबत सादर करावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.