… म्हणून शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली – मोदी 

नवी दिल्ली – महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य काही राज्यांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले. त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला सांगितले. मोदी यांनी बुधवारी सोलापूरमधील अकलूज येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, दिल्लीतील एसी खोलीत बसून अंदाज व्यक्त करणाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती माहीत नसते. आता मला लक्षात आले की शरद पवार यांनी मैदान का सोडले. शरद पवारही मोठे खेळाडू आहेत, त्यांना हवेचा अंदाज येतो. ते स्वत:च नुकसान होऊ देणार नाहीत, म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असावं, असे त्यांनी सांगितले.

भारतासारख्या देशात एक मजबूत नेता हवा असून २०१४ मध्ये जनतेने मला बहुमत दिले. या बहुमतामुळेच मी मोठे निर्णय घेऊ शकलो. गरीबांच्या विकासासाठी काम करु शकलो. लोकांना मजबूत देश हवा की मजबूर देश हवा, हे त्यांनीच सांगावे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची महामिलावट देशाला कधीच मजबूत बनवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

जनतेला मोदी सरकार पुन्हा सत्तेत आणायचे आहे. यासाठी ते स्वतः घरोघरी जाऊन स्वखर्चाने प्रचार करत आहेत. तुमच्या आशीवार्दमुळेच मी काळा पैशांवर आणि भ्रष्टाचारवर आळा घातला आहे. हजारो कोटींचं कर्ज वसूल केले आहे. 3.5 लाखांपेक्षा जास्त बनावट कंपन्या बंद केल्या आहेत, असेही मोदींनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.