पुणे – पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल 30 वर्षीय तरुणाला आय. सी. यु मध्ये उंदीर चावलाय. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय.
सागर रेणूसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघातग्रस्त झाल्याने 16 मार्चला त्याला ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आणि त्याच्यावर आय. सी. यु मध्ये उपचार सुरु करण्यात आले. 25 तारखेला त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती.
मात्र 26 मार्चला आय. सी. यु मध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाच प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याच निधन झाल आहे. डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावला असल्यास उपचार करावेत अस पत्र संबंधित विभागाला लिहलय.