Live Cricket Score, RCB vs LSG Indian Premier League 2024 : आज, आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
दोन्ही संघांना लीगमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एकच सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूने तीनपैकी एक सामना जिंकला आहे आणि लखनऊने दोनपैकी एक सामना जिंकला आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध टाॅस जिंकला आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे दोन्ही संघ भिडतील.
🚨 Toss Update 🚨@RCBTweets elect to bowl against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/ZZ42YW8tPz#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/aquuVQEtm5
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. बंगळुरू संघ लखनौवर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत आहे. चार सामन्यांमध्ये आरसीबीने 3 तर लखनौने केवळ 1 सामना जिंकला आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या एकमेव सामन्यात लखनौने बेंगळुरूचा पराभव केला होता.