pune news । मार्केटयार्ड परिसरात धक्का लागल्याचे कारणावरुन चार महिला बाऊंसरने २३ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला अहे. याप्रकरणी शिला विशाल गायकवाड व तिच्या इतर अनाेळखी तीन बाऊंसर महिला यांच्यावर मार्केटयार्ड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व अराेपी हे एकमेकांचे ओळखीचे नाही. मार्कटयार्ड मधील शारदा गजानन मंदिराजवळ तक्रारदार यांचा व्यवसाय गाळा आहे. त्याचे समाेर रस्त्याचे कडेला तक्रारदार यांचा आरोपीपैकी एकीला धक्का लागला.
याकारणावरुन आरोपी यांनी आमच्यातील एकीला धक्का का लावला असा आराेप तक्रारदार याच्यावर करत वाद सुरु केला. तक्रारदार हे या घटनेचा विडिओ काढत असताना आराेपी यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तक्रारदार हे प्रतिकार करत असताना, त्यातील एकीने तक्रारदार याचे हातावर चावा घेतला. तक्रारदार याची आई व आसपासचे लाेकांनी मध्ये पडून भांडणे साेडवले असता त्यातील एकीने ‘तुझ काय करताे बघ’ अशी धमकी दिली. याबाबत पुढील तपास मार्केटयार्ड पाेलीस करत आहेत.