Manoj Jarange narayan Rane : मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. अशी टीका मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर केली होती. राणेंच्या या टीकेला आता जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.राणे जर असच काही बरळत राहिले तर मी त्यांना सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जरांगे आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असून त्यांनी आपले उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे. राणेंनी केलेल्या टीकेवर जरांगे म्हणाले,”मी राणेंच्या वयाचा आदर करतो. मी त्यांना आजवर कधी काही बोललो नाही. परंतु, ते जर असं काही बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही” | Manoj Jarange narayan Rane
“मी नारायण राणे यांना शेवटचं माफ करतो आणि सुट्टी देतो. परंतु, माझं निलेश राणे यांना सांगणं आहे की तुम्ही नारायण राणेंना थांबवा.. अन्यथा मी इथून पुढे धुवून काढेन, कोणालाही सोडणार नाही असा इशाराच जरांगे यांनी दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील टीकेचा समाचार घेतला. | Manoj Jarange narayan Rane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे. मग आम्हाला मराठा असल्याचा अभिमान का असू नये असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले,”माझा नारायण राणे यांना प्रश्न आहे, तुम्ही तर पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता. मग आता तुम्हाला काय झालंय. मी मराठ्यांसाठी बोलतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजून बोलायला हवं होतं” असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. | Manoj Jarange narayan Rane
काय म्हणाले होते नारायण राणे नेमकं ?
“मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !”, असे नारायण राणे यांनी म्हंटले होते.