पुणे : फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
पवन उर्फ रुद्र युवराज ढिले (वय.२२ रा. १२७८ शेख सल्लाउद्दीन दर्ग्या जवळ कुंभार वाडा कसबा पेठ) असे त्याचे नाव आहे. पुढील एक वर्षासाठी त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे करण्यात आली आहे.
ढिले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने समर्थ, कोंढवा आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, सत्तुर या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खून, खूनाचा प्रयत्न घातक शस्त्र बाळगणे,दंगा असे गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्या विरुद्ध तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
त्यामुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.