पुणे : लोहमार्ग पोलीस भरतीकरता बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यास खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षे सश्रम कारावास, चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सागर लालसिंग राठोड (वय ३१ रा. जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यात न्यायालयाने ४२० (फसवणूक) कलमान्वये आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी तपास केला आहे.