वाघोली (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजप व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. हवेलीतील अनेक दिग्गजांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर,
पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप वाल्हेकर तसेच आजी-माजी पदाधिकारी यांनी अजित दादांची भेट घेत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दादांनी प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपुलकीने विचारपूस केली. पालकमंत्री अजित पवार विजय रणस्तंभ अभिवादनासाठी येणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान असून या नेत्यांना भेटून सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळत असते. अजित दादांना भेटल्याने मनःपूर्वक आनंद झाला.
– रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सद)