Droupadi Murmu – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Droupadi Murmu President of India) या विविध कार्यक्रमांनिमित्त तीन दिवसीय पुणे दौर्यावर आल्या आहेत. त्यांचा दौरा सुरळीत पार पडावा यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने शहरातील वाहतूक मार्गात पुढील तीन दिवस बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Droupadi Murmu) आज पुणे (pune) मुक्कामी आल्या आहेत.
उद्या गुरूवारी (दि. ३०) दुपारी १ ते ४ आणि शुक्रवारी (दि.१) सकाळी ९ ते १२ या वेळेत शहरातून विमानतळाकडे जाणार्या व येणार्या वाहनचालकांनी पुणे नगर रस्त्यावरील रामवाडी ते एअरपोर्ट रोडचा वापर करावा.
या दोन्ही दिवशी संपुर्ण दिवसभर कालावधीत लोहगाव ते विमानतळ आणि विमानतळ ते विश्रांतवाडी दरम्यानच्या मार्गावर दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या माल वाहतूक वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पुणे सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला ते स्वारगेट येथील जेधे चौक व भैरोबानाला ते पुणे स्टेशन या दोन्ही रस्त्यावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणार्या वाहनांसाठी प्रवेश बंदी असेल.
गुरूवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते पाषाण रस्त्यावरील रायगड बंगला हा एकेरी मार्ग दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान व्ही. व्ही. आय. पी. साठी दुहेरी करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.