पुणे – साडेतीन मुहुर्ताला वाहन खरेदी जोमात सुरू असते. दसऱ्यानंतर दिवाळीला लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजला वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यंदा दसरा ते दिवाळी यादरम्यान शहरात 22 हजार 175 वाहनांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी 19 हजार 738 वाहन विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अडीच हजारांनी वाहन खरेदी संख्या वाढली.
पेट्रोल, डीझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. तर पुण्यात रस्ते कमी आणि वाहने जास्त अशी परिस्थिती असतानाही, दरवर्षी हजारोंच्या संख्येने नव्याने वाहने रस्त्यावर येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीमध्ये वाहनखरेदी तेजीत असते.
यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर 10 हजार 872 वाहन खरेदी झाली. तर, अवघ्या तीन आठवड्यांत दिवाळीत लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी तब्बल 11 हजार 303 वाहनांची विक्री झाली. दसऱ्यापेक्षा दिवाळीत वाहनखरेदी अधिक झाल्याचे दिसून येते.
वाहनांची विक्री दसरा ते दिवाळीपर्यंत…
कालावधी दुचाकी चारचाकी मालवाहतूक रिक्षा बस टॅक्सी एकूण 25 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 14,542 5,175 734 1,063 82 579 22,175