शहरातील रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांच्या घरात
पुणे – गेल्या चोवीस तासांत 363 करोनाबाधितांची नव्याने नोंद करण्यात आली. यांचा समावेश करून शहरातील बाधितांची संख्या पावणेदोन लाखांच्या घरात गेली आहे.
महापालिकेने जवळपास 8 लाख 75 हजार 548 स्वॅब टेस्टिंग आजपर्यंत केले आहेत. त्यात 1 लाख 75 हजार 117 करोनाबाधित सापडले असून, त्यातील 1 लाख 65 हजार 514 जण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत 268 जणांना घरी सोडले आहे.
शहरात 5,044 ऍक्टिव्ह केसेस असून, त्यातील 373 क्रिटिकल रुग्ण आहेत. त्यापैकी 226 जण व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील एक पुण्याबाहेरील आहे. यांचा समावेश करून एकूण मृतांची संख्या 4,559 झाली आहे. दिवसभरात 3,270 स्वॅबटेस्ट घेण्यात आल्या.