हडपसर – मतदार यादी व बूथ कमिटी हे सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून संपूर्ण पक्ष संघटना यावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच महापौर होणार, याबाबत कुठलीही शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
“संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या संकल्पनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात “राष्ट्रवादी परिवार संवाद हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगावशेरी, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.