पुणे- पुणे मेट्रोच्या रेंज हिल्स ते स्वारगेट भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. दुसऱ्या बाजूला स्वारगेट येथे भव्य “मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ वेगाने उभारले जात आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. करोनामुळे या प्रकल्पाला काहीसा अधिक वेळ लागत असला, तरी आता हा वेग भरून काढला जात आहे. प्रकल्प पूर्ण होताच वाहतूक व्यवस्थापनाचे हे “सुपर मॉडेल’ ठरणार आहे.
प्रकल्प कशासाठी?
वाहतुकीची सर्व साधने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार. यात मेट्रो, पीएमपी, एसटी, कॅब, ऑटोरिक्षा एकाच छताखाली मिळणार.
प्रमुख फायदा
स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकात दररोज सरासरी दीड ते दोन लाख वाहने ये-जा करतात. तर, येथील वाहनांची प्रतितास वारंवारिता सरासरी 10 हजार आहे. ट्रान्सपोर्ट हब पूर्ण झाल्यावर येथील बहुतांश वर्दळ एकाच ठिकाणी येईल.
कोठे आहे प्रकल्प?
स्वारगेटहून सारसबागेकडे जाताना डाव्या बाजूला हा प्रकल्प उभारला जात आहे. येथील उड्डाणपुलावरून पाहिल्यास या प्रकल्पाची भव्यता लक्षात येईल.
असा असेल प्रकल्प
साधारणपणे 30 मजली भव्य इमारत.
अंडरग्राउंड 5 मजले बांधकाम
65 लाख स्क्वेअर फूट : एकूण बांधकाम क्षेत्र
मल्टिप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विविध कार्यालयेदेखील एकाच इमारतीत
वाहनतळासाठी स्वतंत्र जागा
दुसऱ्या टप्प्यात एसटी बसस्थानक निर्मिती
प्रकल्पाची माहिती
एकूण किंमत : 200 कोटी रु. (अंदाजे-पहिला टप्पा)
दोन टप्प्यांत पूर्ण होणार प्रकल्पाचे काम
भुयारी मेट्रोसाठी खास स्टेशन