पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास निश्चित झाला आहे. त्यातच आता पुण्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात आता पुण्याच्या कसबा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे अरविंद शिंदे या निवडणुकीत उभे होते.
कसबा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहेत. गिरीष बापट यांना खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या जागी कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली होती. या संधीचे त्यांनी सोने केले आणि जवळपास 35 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.