#व्हिडीओ : विजयाच्या दिशेने कुच करणाऱ्या आमदार लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. ते नुकतेच मतमोजणी केंद्रावर दाखल झाले असून त्यांची पहिली प्रतिक्रिया डिजीटल प्रभातवर…

भोसरी मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात लढत आहे. त्यांच्यासह 12 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. या मतदार संघात 58.65 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2 लाख 58 हजार 719 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

याठिकाणी 20 टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या 21 फेर्‍या होणार असून पहिल्या फेरीपासूनच लांडगेंची आघाडी घेतली असून त्यांच्या मतांच्या जवळपास पोहचताना लांडे यांची चांगलीच दमछाक झाली. प्रत्येक फेरीअखेर लांडे हे लांडगेंच्या तुलनेत निम्म्या मताने मागे असल्याचे पहायला मिळाले. लांडगेंची सततची आघाडी पाहून त्यांच्या समर्थकांनी भंडार्‍याची उधळण सुरु केली आहे. तर विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी बालेवाडीतील मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.