पुणे – भिडे वाडा आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कायदेशीर लढा यशस्वी केल्याबद्दल महिला दिनाच्या पूर्व संध्येला पुणे महापालिका विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मातंग एकता आंदोलन महिला आघाडीच्या वतीने मुक्ता साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजी मंत्री रमेश बागवे व जैनब बागावे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. महिला दिनाच्या पूर्व संध्येला विविध क्षेत्रातील महिलांना यावेळी गौरविण्यात आले.
डॉ. माधुरी रोकडे अस्मिता तांबे धुमाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक तोटेवार मॅडम यांना गौरविण्यात आले. माजी नगरसेवक अविनाश बागवे, महिला अध्यक्षा राजश्री अडसूळ, रेखा खंडाळे, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी तर प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले.