पुणे – करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांत आता आटोक्यात आले आहेत. मात्र, मागील आठवड्यात ग्रामीणमध्ये रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाल्याचे दिसून येते.
दरम्यान, या आठवड्यात ससून रुग्णालयात नव्याने 5 रुग्ण दाखल झाले.सध्या पुण्यात 44, पिंपरी-चिंचवडमध्ये 2, ग्रामीण भागात 3, तर ससून रुग्णालयात 95 अशा 144 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पुण्यात 428, पिंपरी-चिंचवडमध्ये 264, ग्रामीण भागात 85 आणि ससून रुग्णालयात 363 अशा 1 हजार 140 रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडले आहे. शहरासह जिल्ह्यात एकूण 217 जणांचा मृत्यू झाला असून, या आठवड्यात एकही मृत्युची नोंद नाही. दरम्यान, ससून रुग्णालयात दाखल बहुतांश रुग्ण बाहेरील जिल्ह्यातून व ग्रामीणमधून आलेले आहेत. तर पुणे शहरात सध्या 44 जणांवर उपचार सुरू आहेत.