काय सांगता.! नुसरत जहॉं पुन्हा अडकली विवाह बंधनात?

अभिनेत्री नुसरत जहॉं ही खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुसरतने मुलाला जन्म दिला. यीशान असे मुलाचे नाव असून मुलाच्या जन्मावरून देखील नुसरतला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता नुसरतने अभिनेता यश दासगुप्ता याच्याशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नुसरतने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात लाल आणि सफेद रंगाची साडी नेसली आहे आणि एखाद्या विवाहित वधूप्रमाणे ती दिसत आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमुळे नुसरतने लग्न केल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

याआधी देखील नुसरतचे यश दासगुप्ता सोबत लग्न झाल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. यशच्या वाढदिवसाला नुसरतने एक फोटो शेअर केला होता. ज्यात केकवर पती-पत्नी असे लिहिले होते. यावरून दोघांचे लग्न झाले आहे, असा अंदाज लावण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

मात्र, नुसरत किंवा यश या दोघांकडून यावर कोणताही खुलासा करण्यात आला नाही. नवरात्रीनिमित्त यश आणि नुसरत यांना पंडाला येथे स्पॉट करण्यात आले होते. नुसरतचा मुलगा

यीशानचा जन्म झाला त्यावेळीस नुसरत आणि बाळाच्या आरोग्याची माहिती यशकडून देण्यात आली होती. यीशानच्या जन्मपत्रिकेवरही यश दासगुप्ताचे नाव असल्याचे समोर आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.