सहकार नगर – महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 14 वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती होत आहे. 2023 मध्ये या संदर्भात परीक्षा घेण्यात आली त्यास शिक्षक अभियोग्यता चाचणी, असे संबोधले जाते. ही परीक्षा होऊन जवळपास एक वर्ष झाले. आता, यासंदर्भातील जाहिरातीमध्ये सतत बदल होत आहेत.
चुकीच्या पद्धतीने जाहिरात प्रदर्शित केल्या जात आहेत. एका विशिष्ट गटाला म्हणजेच इंग्रजी माध्यमाला अवास्तव पदे चुकीच्या मार्गाने दिली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे.
याबाबत मनसे जनहित संघाचे महाराष्ट सरचिटणीस जयराज लांडगे यांनी सांगितले की, 2018 ने कोर्टाने शासनाने दिलेले 20 टक्के आरक्षण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचे फेटाळले होते तरी याचा अर्थ माननीय आयुक्त महोदय आपण सोयीनुसार पदे द्यावी, असा काढलेला आहे.
जवळपास दोन लाख सोळा हजार मुलांनी शिक्षक भरती परीक्षा दिली व त्यातील दोन लाख दहा हजार मुले मराठी माध्यमाचे आहेत व केवळ पाच ते सहा हजार मुले इंग्रजी माध्यमाची असून या मुलांना 5000 जागा देण्याचे नियोजन सरकारने केले आहे. उर्वरित दोन लाख दहा हजार मुलांना केवळ मराठी असल्यामुळे काही ऊर्वरीत जागा वाट्याला येणार आहेत, भरती होत असताना गुणवत्तेनुसार व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.