पुणे –महसूल विभाग सर्वसामान्यांशी निगडित विभाग असून या विभागांतर्गत अनेक कामे केली जातात. ही कामे सहजतेने आणि बिनचूक झाली पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून 2024 पर्यंत विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या निर्णयामुळे नागरिकांची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होतील. त्याचबरोबर सातबारा नव्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा नवीन सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहे. याचसह महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच पदे भरली जातील, असेही थोरात यांनी सांगितले.