बार असो. कडे वकिलांनी नोंदविली मते
पुणे – न्यायालय सुरू करण्याबाबत पुण्यातील वकील सकारात्मक आहेत. याबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश (पीडीजे) नीरज धोटे आणि उच्च न्यायालयाला पत्र देऊन पुणे बार असोसिएशनच्या वतीने कळविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी दिली.
करोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून न्यायालयाचे कामकाज बंद आहे. केवळ जामीन, गुन्ह्यातून वगळणे, शिक्षावर युक्तीवाद, अशा महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सुनावणी होत आहे. याचा परिणाम वकिली व्यवसायावर झाला आहे. वकिलांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: नवोदीत वकिलांचे हाल होत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा नियम पाळून न्यायालय सुरू करण्याची मागणी राज्यातील वकिलांकडून होत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यातील वकिलांकडून न्यायालयाचे कामकाज वाढविण्यासाठी मते मागवली आहेत. त्यामुळे न्यायालयाचे प्रत्यक्ष काम सुरू करावे की नको, याबाबत मत नोंदविण्याचे आवाहन पुणे बार असोसिएशनने केले होते. त्यानुसार वकिलांनी 40 ते 50 व्हॉट्सअप ग्रुप आणि माझ्या व्हॉट्सअपवर प्रत्यक्ष मत नोंदविल्याचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले