प्रशासक पाहणार सुमारे डझनभर गावांचा कारभार
भोर- भोर तालुक्यात 21 ऑगस्टपासून मुदत संपणाऱ्या 73 ग्रामपंचायतींवर पुढील तीन महिने या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने तसा आदेश काढण्यात आल्याने या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. या ग्रामपंचायतीचा कारभार सहा प्रशासकांकडून पाहिला जाणार, असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले. 156 पैकी भोलावडे व किवत ग्रामपंचायतींवर या आधीच प्रशासकाची नेमणूक केली आहे.
करोनामुळे सरकारला ऑगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने पुढील तीन महिने ग्रामपंचायतींवर सहा विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून यात पंचायत समितीचे तीन विस्तार अधिकारी, शिक्षण विभागाचा एक विस्तार अधिकारी, तर कृषी विभागाचे दोन अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार भोर तालुक्यातील ऑगस्ट व नोव्हेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 74 पैकी भोलावडे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्याने भोलावडे व किवत ग्रामपंचायतीवर यापूर्वीच प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.
या ग्रामपंचायतींवर सहा विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, भोर पंचायत समितीचे तीन, पंचायत समिती शिक्षण विभाग एक आणि कृषी विभाग दोन यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक प्रशासकाकडे 11 ते 12 ग्रामपंचायती देण्यात आल्या असून, त्यांच्यामार्फत कारभार चालवला जाणार आहे.
- या ग्रामपंचायतींवर प्रशासक
- केळावडे, रांजे, नसरापूर, कासुर्डी खे. बा, कामथडी, साळवडे, आळंदे, आळंदेवाडी, इंगवली, संगमनेर, जोगवडी, नऱ्हे,
गोरड, म्हसवली, कापूरहोळ, किकवी, सारोळे, नाझरे, उत्रौली, वडगाव डाळ, धावडी, बाजारवाडी, चिखलगाव, पोम्बर्डी,पान्हवळ, चिखलावडे, भाबवडी, मोरवाडी, शिंदेवाडी, शिवरे, वेळी, वर्वे खुर्द, कांजळे, खोपी, ससेवाडी, वर्वे बुद्रुक,दिवळे, देगाव, नायगाव, निगडे, कुसगाव, भोंगवली, न्हावी-322, न्हावी-315, पेंजळवाडी, गुणंद, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक, मोहरी खुर्द, मोहरी बुद्रुक, तांभाड, जांभळी, पांडे, राजापुर, सावरदरे, उंबरे, धांगवडी, टापरेवाडी, केंजळ पिसावरे, बालवडी, गोकवडी, माझगाव, बारे बुद्रुक, महुडे बुद्रुक, नांद शिंद, गवडी, म्हाळवडी, वेनवडी, खानापूर, आंबाडे, नेरे, पाले.