पुणे – पुणे ते लातूर मार्गावरील प्रवाशांची ‘इंटरसिटी’ची मागणी पूर्ण होत आहे. पुणे ते हरंगुळ (लातूर) विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सध्या नवरात्री, दिवाळी यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक वाढेल. त्या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत दररोज ही गाडी पुणे-हरंगुळ-पुणे अशी धावणार आहे.
हरंगुळ हे लातूरजवळील स्थानक आहे. पुणे ते लातूर या मार्गावर ट्रेन संख्या कमी आहे. त्यांना खूपच गर्दी असते. त्यामुळे विशेष ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव पुणे विभागाने रेल्वे बोर्डाला पाठविला होता. असे आहे वेळापत्रक आणि मार्ग ही गाडी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पुण्याहून सुटेल. तर त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी गाडी हरंगुळला पोहोचेल.
तसेच हरंगुळ येथून ही गाडी दुपारी तीन वाजता पुण्याच्या दिशेने सुटेल आणि त्याच दिवशी ती पुण्यात रात्री नऊ वाजता पोहोचेल. हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव असे थांबे या ट्रेनला असतील.