पुणे(प्रतिनिधी) :- कुणाल पोळ खून प्रकरणाचा निकाल आठ वर्षांनी लागला आहे. सबळ पुराव्या अभावी 21 जणांची सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
बचाव पक्षातर्फे अॅड. इब्राहिम अब्दुल शेख , अॅड. सचिन कुंभार, अॅड. विनायक माने, अॅड. ओमकार सोहनी यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. अशरफ अख्तर शेख, अॅड. विवेक शिंदे, अॅड. शिवाजी गायकवाड, अॅड. हर्षदा ताईवडे यांनी सहकार्य केले.
पोलिसांनी केस मधील सर्व पंचनामे सराईत पंचामार्फत केले असून आरोपींकडून मिळालेले पिस्तुल, काडतूस, इतर मुद्देमाल, रासायनिक प्रयोग शाळेस पाठवण्यास उशीर झालेला आहे. तसेच आरोपींच्या कपड्यावरील मिळालेले रक्त मयताच्या रक्ताशी मॅच झालेले नाही. आरोपींकडून झालेली जप्ती ही संशयास्पद आहे. साक्षीदारांच्या साक्षीत विसंगती आहे. त्यामुळे सर्वांची मुक्तता करण्याचा युक्तीवाद अॅड. इब्राहिम शेख यांनी केला.
या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी खूनसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. जानेवारी 2014 मध्ये सेव्हन लव्हज चौक येथे हा प्रकार घडला. जंगल्या ऊर्फ विशाल श्याम सातपुते, सागर मोहन शिंदे, अमित नारायण घाडगे, हरीश नरसिंगराव कोंडाळ, किरण दशरथ थोरात, आकाश रमेश भुतेकर, मंगेश श्याम सातपुते, तुषार शाम सातपुते यांच्यासह 21 जणांची मुक्तता झाली.