पुणे – कात्रज प्राणिसंग्रहालय ‘ठंडा-ठंडा-कूल-कूल’

वाढत्या उष्णतेमुळे यंदा महिनाभर आधीच केली व्यवस्था

पुणे – शहरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. या उन्हाचा चटका माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसत आहे. यामुळेच यंदा कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात मार्चपासूनच “कूलिंग’ व्यवस्था बसविण्यात आली आहे. वन्यप्राण्यांसाठी दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाणारी ही व्यवस्था यंदा प्राणिसंग्रहालय प्रशासनाला कडक उन्हामुळे एक महिनाआधीच करावी लागत आहे.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातर्फे प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांचा उन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय राबविले जात आहे. यामध्ये प्राण्यांच्या गुहेत कूलर बसविणे, वॉटर गनद्वारे भिंतीवर पाण्याचा शिडकावा करणे, खंदकांमध्ये पाण्याचा साठा करणे, तसेच चिखलांच्या खड्ड्यांची व्यवस्था करणे असे विविध उपाय करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त पिंजऱ्यांमध्ये पाण्याच्या फवारा करणारे फॉगरदेखील बसविण्यात आले आहेत. संग्रहालयातील हत्तींना दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ घालण्यात येते.

विविध उपाययोजनांद्वारे या प्राण्यांचे उन्हापासून बचाव करण्यासोबतच संग्रहालयातील हिरवाई जपण्यासाठीदेखील विशेष प्रयत्न केले जात आहे. यामुळे प्राण्यांना दिलासा मिळण्याबरोबरच संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनादेखील उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार नाहीत, याची काळजीदेखील प्रशासनाकडून घेण्यात येत आहेत. सध्या संग्रहालयात तब्बल 66 प्रजातींचे एकूण 420 प्राणी आहेत. यामध्ये सापासारखे सरपटणारे प्राणी, वाघ, बिबट्या, सिंह,हत्ती,अस्वल यांसारखे वन्यप्राणी तसेच हरिण, सांबार यांसारखे तृणभक्षी प्राणी यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.