नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज हार्दिक पटेल यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना झटका बसला आहे.
हार्दिक पटेल यांच्यावर २०१५मध्ये करण्यात आलेल्या पाटीदार आंदोलनादरम्यान हिंसा भडकविण्याचा आरोप सिद्ध झाला असल्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही. हार्दिक पटेल यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
Lower court at Mehsana, Gujarat had sentenced him to 2 yrs' imprisonment in July last yr, for rioting & arson in 2015, during the Patidar quota protests. He had then approached Gujarat HC seeking suspension of his conviction so he can contest elections, but his plea was rejected. https://t.co/EwOptNblaS
— ANI (@ANI) April 2, 2019
दरम्यान, हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून गुजरातेतून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यासाठी ४ एप्रिल ही शेवटची तारीख आहे.