पुणे : “प्रभू श्री रामचंद्र यांच्या विषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सडक्या बुद्धीचे केविलवाणी प्रदर्शन केले आहे. सातत्याने हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्ये करून हिंदूंच्या भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला आम्ही पुण्यात फिरू देणार नाही” असा कडक इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला.
काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे)चिंतन शिबीर शिर्डी येथे झाले त्यावेळी बोलताना आमदार आव्हाड यांनी ‘श्री राम हे मासांहारी होते’ असे वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा निषेध आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आंदोलन करून करण्यात आला
यावेळी बोलताना घाटेबोलत होते.
यावेळी घाटे यांनी ,”प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत येत्या २२ जानेवारीला लोकर्पित होत असताना ह्या धर्मांध आमदाराने वक्तव्य करून संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत ह्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करत आहे.” असे म्हटले.
या आंदोलनाला घाटे यांच्यासह कॅन्टोमेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे , माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक,कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, सुशील मेंगडे,सरचिटणीस पुनीत जोशी,रवींद्र साळेगावकर,सुभाष जंगले, राजेंद्र शिळीमकर ,राघवेंद्र मानकर, राहुल भंडारे, वर्षा तापकीर, करण मिसाळ, हर्षदा फरांदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.