करोनामुळे जेईई मेन्स परीक्षाही लांबणीवर

पुणे -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील आयआयटी, एनआयटी, प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन्सची मे महिन्यात होणारी परीक्षा स्थगित झाली आहे. यासंबंधीची माहिती मंगळवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्‌विट करीत दिली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) दरवर्षी जेईई मेन्स ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जात होती. मात्र, यंदा करोनामुळे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यांत परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांतील परीक्षा झाली आहे. त्यानंतर आता एप्रिल महिन्यातील 27, 28 आणि 30 या तारखेला होणारी परीक्षाही पुढे ढकलली होती.

आता मे महिन्यात होणारी परीक्षाही पुढे ढकलली आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने सीबीएससी बारावीची परीक्षा पुढे ढकलली, तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवीची “नीट’ परीक्षाही पुढे ढकलली आहे. महाराष्ट्रात इयत्ता दहावी, बारावी, एमपीएससी या परीक्षांवर परिणाम झालेला आहे. या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.