पुणे – महापालिकेने यंदा फटाका विक्री स्टॉलचा ऑनलाइन लिलाव केल्याने तब्बल पाचपट उत्पन्न मिळाले आहे. यापैकी नारायण पेठेतील वर्तक बागेलगतच्या 35 स्टॉल्सच्या बारा दिवसांच्या भाड्यापोटी 59 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर शहरातील उर्वरित सुमारे 97 स्टॉल्सचे 11 लाख लाख असे एकूण 70 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिका गेली अनेक वर्षे फटाका विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देते. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्सचा लिलाव करण्यात येतो. काही वर्षांपासून वर्तक बाग येथे सर्वाधिक स्टॉल्स असतात. येथे घाऊक विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने व्यवसायही चांगला होतो. तसेच उपनगरातही सुमारे 35 स्टॉल्स असतात.
तुलनेने या स्टॉलसाठीचे भाडेदर हे कमी आहेत. त्यामुळे मागील वर्षी 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, मागील वर्षी वाद झाल्याने महापालिकेने यंदा ऑनलाइन लिलाव करण्याचा निर्णय घेतला. अखेर हा निर्णय महापालिकेस फायदेशीर ठरला असून यंदा तब्बल पाचपटीने पालिकेचे उत्पन्न वाढले आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा महसूल तिजोरीत जमा झाला आहे.