मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) सकल मराठा समाजाच्या वतीने अवसरी फाटा येथे पुणे नाशिक महामार्गावर मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादीचे शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी सरकारचा निषेध करत सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबरोबरच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अवसरी खुर्द येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून गाव बंद ठेवून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
या उपोषणाला गावातील तरुण मुले, मुली, ग्रामस्थ सहभागी झाले होते. सरपंच कमलेश शिंदे, माजी उपसभापती संतोष भोर, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, अवसरी खुर्द राष्ट्रवादी प्रमुख राजेंद्र भोर, तंटामुक्तगाव समितीचे अध्यक्ष रामदास भोर, पोलीस पाटील संतोष शिंदे, मनोज शिंदे, उ
त्तमराव शिंदे, माजी उपसरपंच दिनेश खेडकर, प्रवीण टेमकर, योगेश वायाळ, गोविंद इंदोरे, विवेक टेमकर आणि वाड्यावस्त्यांवरील सर्व पक्षीय कार्यकर्ते साखळी उपोषणासह रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.