पुणे – गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा दि. 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, त्या सुरू करताना कोणती काळजी घ्यावी, याच्या मार्गदर्शन सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत. राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या स्वाक्षरीने या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शाळा, विद्यार्थी, पालकांनी हे नियम पाळण्यासह आपल्या चिमुकल्यांची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
- सर्वांसाठी प्रतिबंधात्मक सूचना
- दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवणे
- प्रत्येकाने फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे
- वारंवार हात धुणे आवश्यक, विद्यार्थी आणि संबंधितांनाही त्याचे प्रशिक्षण द्यावे
- शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे
- अन्य श्वसन संस्थेचे शिष्टाचार पाळण्यात यावेत. म्हणजे खोकताना, शिंकताना काळजी घ्यावी.
- मुले ज्या बस अथवा अन्य वाहनाने शाळेला येतात, त्या वाहनांमध्ये मुलांची गर्दी असू
- नये, आवश्यकतेनुसार अशी वाहने 1 टक्के सोडियम हायपोक्लाराइट द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावीत.
- करोनासदृश लक्षणे दिसली तर पालक आणि वैद्यकीय सुविधा केंद्रास कल्पना द्यावी. विद्यार्थ्याला मास्कसह शाळेतील वेगळ्या खोलीत ठेवावेत.
- इतर कारणांमुळे बाधित विद्यार्थ्याच्या निकट संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची/शिक्षकांची यादी करावी
- अशा निकट सहवासितांना दोन आठवड्यांसाठी होम क्वॉरंटाइन करावे. विद्यार्थी
- कोविडबाधित आढळून आल्यास तेथील बाके, स्वच्छतागृहे आणि सामायिक जागा
- निर्जंतुक करावेत. क्वॉरंटाइन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
- एकाच वर्गातील 5 पेक्षा अधिक मुले दोन आठवड्यांच्या कालावधीत बाधित आढळल्यास शाळेतील करोना प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा आवश्यक.
- शाळेचे नियोजन
- ज्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींनाच शाळेत येण्याची परवानगी द्यावी.
- कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडू नयेत. तसेच या क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षकांना शाळेत प्रवेश नाही.
- शाळेची संपूर्ण स्वच्छता करावी. वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग
- 1 टक्के सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाने पुसून घ्यावेत.
- करोना काळात ज्या शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापररलेल्या आहे, शाळा आणि
- परिसरातील संपूर्ण स्वच्छता काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे करावी.
- शाळेमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पद्धत टाळावी
- मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- मैदानावर प्रार्थनास्थळी शारिरिक अंतराचा विषय लक्षात घेऊन खुणा कराव्यात. हीच
- पद्धत स्टाफ रूम ग्रंथालये आदी ठिकाणी वापरावी.
- शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामुहिक प्रार्थना टाळाव्या.
- शाळेतील जिम्नॅशियममध्ये प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.
- अतिजोखमीचे आजार,गर्भवतीनी विशेष काळजी घ्यावी
- फेसमास्क, फेसकव्हर, सॅनिटायझर वगैरेचा पुरेसा साठा ठेवावा.