पुणे – पाडव्याला अनेक नागरिक शुभ मुहूर्त साधत वाहन खरेदी करतात. यंदादेखील शहरात जोरदार वाहन खरेदी झाली असून, आठवडाभरात तब्बल 6 हजार 193 वाहनांच्या खरेदी नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याला नागरिक वाहन खरेदीला प्राधान्य देतात. मागील दोन वर्षे गुढीपाडव्याला वाहन विक्री झाली नव्हती. मात्र, यंदा आठवडाभरात आरटीओकडे आठवडाभरात हजारो वाहनांची नोंदणी झाली आहे. 24 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत 6 हजार 193 वाहनांची नोंद झाली. यामध्ये 3 हजार 429 दुचाकी, 2 हजार 229 चारचाकी, 23 बसेस, 316 मालवाहू वाहने, 168 रिक्षा आणि 28 प्रवासी टॅक्सीचा समावेश असल्याची माहिती कार्यालयाकडून
देण्यात आली.