खडकवासला – पुणे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातून तपासणीसाठी मोक्यातील व गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. संतोष बाळू पवार (वय 23, रा. खानापूर, ता. हवेली) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. ताब्यात आसलेला आरोपी पळून जातोच कसा? पोलिसांच्या कार्याबद्दल संशय निर्माण होतो.
संतोष पवार याने गावातील त्याच्या साथीदारांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून हातातील बेडीसह पळून गेला आहे. त्याचे गावातील साथीदारही फरार आहेत. पोलीस प्रशासन अधिकाऱ्यासह फौजफाटा खानापूर गावात दाखल झाला आणि खानापूर गावात परिसरात वाऱ्यासारखी ही बातमी पसरली.
आरोपी व साथीदार यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. अंधार व जंगलाचा फायदा घेत आरोपी पळाला. या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर येत आहे. खानापूर परिसरात पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस त्याला शोधण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करीत आहेत.