पौड -भुकूम (ता. मुळशी) पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. येथील पुणे-कोलाड महार्गालगत भव्य श्री रामेश्वर क्रीडा नगरी उभारण्यात आली आहे. यावेळी कुस्तीचे आखाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री मारुतीला आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते माती आखाडा आणि गादी आखाडा पूजन करण्यात आले.
या क्रीडा नगरीमध्ये भव्य पार्किंग, तसेच पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी आसन व्यवस्था केली आहे. या कुस्ती स्पर्धेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून अतिशय नियोजनबद्ध कुस्त्यांचे आखाडे रंगत आहेत. या स्पर्धेसाठी गावातील तरुणांनीच पुढाकार घेऊन ही स्पर्धा खेचून आणली आहे. यावेळी मुळशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष महादेव कोंढरे, पुणे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, तालुका अध्यक्ष शिवाजी तांगडे, भूगावचे उपसरपंच कालिदास शेडगे, भाजप सहकार आघाडी अध्यक्ष सोपान निबुदे,
माजी सरपंच भीमराव गोळे, माजी सरपंच नामदेव माझिरे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे, हनुमंत गावडे, अजित इंगवले, राहुल शेडगे, गोविंद आंग्रे, पांडुरंग मराठे, तुषार माझिरे आदी मान्यवर, ग्रामस्थ आणि कुस्ती शौकिन उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन माजी उपसरपंच सचिन आंग्रे, माजी उपसरपंच सचिन हगवणे, उपसरपंच अंकुश खाटपे, ग्रामपंचायत सदस्य निलेश ननावरे आणि भुकूमचे समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.