वाघोली – येरवडा ते वाघोली दरम्यान पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी महापालिका अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरवडा ते वाघोली दरम्यान पाहणी केली. वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारे सर्व अतिक्रमणे हटवून अन्य उपाययोजना करण्याबाबत देखील चर्चा झाली. येरवडा ते वाघोली दरम्यान पुणे नगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिक खूप त्रस्त आहेत.
वाघोलीत तर वाहतूक कोंडीचा कळस झाला आहे. दररोज नागरिकांना सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून ही कोंडी हटविण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप, पथ विभाग उपायुक्त व्ही. जी. कुलकर्णी, पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय मगर,
पोलीस अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. वाघोली परिसरातील होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पंचक्रोशीतील गावांमधून ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून यातून मार्ग काढण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कायमस्वरूपी चालू राहणे गरजेचे आहे. यासाठी मनपाने लक्ष द्यावे. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-अविनाश सातव पाटील, सचिव पुणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा