पुणे/कोरेगाव भीमा -कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळी आणि परिसरामध्ये पहिल्यांदाच हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. यावेळी महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात वाघमारे म्हणाले, आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका, बाह्यरुग्ण तपासणी विभाग (ओपीडी), दुचाकी रुग्णवाहिका देखील कार्यक्रमस्थळी असतील.
त्यासोबतच महिलांसाठी स्वतंत्र ओपीडीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वतंत्र शौचालये उभारण्यात येत आहेत. यावर्षीपासून महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय कोरोनाच्या संभाव्य धोक्यामुळे नागरिकांना मास्क देण्याचे विचारधीन असल्याचे ही वाघमारे यांनी सांगितले.