पिंपरी – मोबाइलवर लिंक पाठवून त्याआधारे तरुणाला आर्थिक फायदा करून देण्याच्या आमिष दाखवले. त्यातून तरुणाकडून 2 लाख 53 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना चिंचवड येथे घडली. याबाबत स्वप्नील विलास मुसणे (वय 26, रा. चिंचवड) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता.
त्यावरून शुक्रवारी (दि. 2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील यांना एका मोबाइल क्रमांकावरून एक लिंक आली. त्यांद्वारे आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून 2 लाख 53 हजार रुपये घेऊन फसवणूक केली.