सविंदणे -शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डमध्ये दाम्पत्य पुणे येथे जाण्यासाठी आलेल्या एसटीमध्ये चढत असताना एका महिलेसह तीनजणांनी 80 हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. याबाबत फिर्यादी संगीता रामदास सुरासे (वय 44, रा. इचलकरंजी) यांनी दिली आहे. नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी आरोपी निकेश गफुर भोसले, महिला काट्या निकेष भोसले, इसरांत्या विजय काळे यांच्यावर जबरी चोरीप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (दि.27) रोजी सायंकाळी शिरूर एसटी स्टॅन्ड येथे संगीता सुरासे व पती हे पुणे येथे जाण्याकरिता एसटीत चढत असताना आरोपी निकेश गफुर भोसले, काटया निकेष भोसले (दोघे रा. शिरूर),
इसरांत्या विजय काळे (रा. शिरूर) असे त्यांच्याकडे भिक मागण्याकरिता दोन लहान पोर पाठवून भिक मागण्याचा बहाणा करून ते एसटीत चढत असताना तिघांनी संगीता सुरासे यांच्याकडील पर्स बळजबरीने हिसकावून दागिने व साहित्याची चोरी करून पळून गेल. त्यास पकडताना निकेश गफुर भोसले व काटया भोसले यांनी फिर्यादीस अडवून त्यास पळून जाण्यास मदत केली. दोघांना नागरिकांनी पकडले. तिघांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.