सविंदणे – काठापूर (ता. शिरूर) येथे बैलगाडा शर्यत सुरू असून घाटातून दुचाकी चोरीला गेली आहे. यापूर्वीही एक दूचाकी चोरीला गेली असल्याने बैलगाडा शर्यतीत दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे की, काय अशी भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालींदर दत्तात्रय दांगट यांची एमएच 14 एच 58884 ही दुचाकी शुक्रवारी (दि. 27) चोरीला गेल्याची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, यापूर्वी मल्हारी लबडे यांची दुचाकी चोरीला गेली आहे.