सासवड -पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार येथील शिवशंभो बचत गटाच्या रेशनिंग दुकानात काळाबाजार होत असल्याची तक्रार पुरंदरचे पुरवठा अधिकारी सुधीर बबन बडदे (वय 48) यांनी यांनी जेजुरी पोलीस ठाण्याला दाखल केली आहे. तर जेजुरी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून रेशनिंग दुकानदार चालक राजेंद्र सर्जेराव गायकवाडवर गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी यांचे भाऊ जालींदर सर्जेराव गायकवाड, बप्पा चाचर, पोलीस पाटील दादा पांडे यांनी मावडी कडेपठार गावातील शिव शंभो बचत गट रेशनिंग दुकान समोरुन एक पिकअप गाडी संशयित रित्या रेशनिंगचे धान्य घेऊन जात असताना जालींदर ायकवाड यांनी पिकअप गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता गणेश शंकर राणे (रा. जवळार्जुन) याने गाडीस पळुन जाण्यास मदत केली.
तसेच पिकअप गाडीतील हमाल दिलीप सुरेश राम (रा. सुपे ता. बारामती) हा खाली राहिल्याने तो हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता पिकपच्या मालकाचे नाव शुभम चांदगुडे असे असलेचे सांगितले. ही बाबत यातील तक्रारदार जालींदर सर्जेराव गायकवाड यांनी मंडल अधिकाऱ्यांना घेऊन येऊन शिवशंभो रेशनिंग दुकानचे स्टॉक चेक करून परत येतो असे म्हणाले व निघुन गेले.
याबाबत जेजुरी पोलीस ठाण्याला याबाबत नोंद घेण्यात आली असून या तपासावरून आम्हास अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार दुकानाचे सर्व दप्तरे पाहिले असता यामध्ये तफावत आढळून आली असल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.