मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. दरम्यान, 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर रकुलप्रीत अभिनेता अजय देवगण सोबत “दे दे प्यार दे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आली. या चित्रपटाला चांगली पसंती मिळाल्यामुळे ती अनेक बॉलीवूड निर्मात्यांच्या नजरेत आली.
रकुलप्रीत आपल्या परफेक्ट फिगरसाठी प्रचंड मेहनत घेते. तिला वर्कआऊट करणे प्रचंड आवडते आणि त्यामुळे ती रोज जिमला जाते. ती अनेक वेळा तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि तिचे फॅन्स सुद्धा तिच्या या व्हिडिओ-फोटोंवर प्रचंड प्रेम करत असतात. लॉकडाऊन दरम्यानही ती तिच्या इंस्टा वॉलवर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत होती.
रकुलप्रीत जिम वर्कआउट्स, योगा, रनिंग आणि कधी कधी गोल्फ खेळताना दिसली. एवढंच नाही तर टाईम मॅनेजमेंटसाठी रकुलप्रीत सायकल चालवत असते. असं तिने स्वतः एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. रकुलचे वर्कआउट्स करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.