पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे. दरम्यान भरतीचा एक टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील भरती जाहीर झाली आहे. शहर पोलिसांनी तिसऱ्या टप्प्यातील भरतीची देखील तयारी सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात 720 पदांची भरती झाली असून दुसऱ्या टप्प्यात 216 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यात 546 पदांची भरती केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील पोलीस भरतीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात 720 पैकी 50 उमेदवार परीक्षा घोटाळ्यात अपात्र झाले. ती पदसंख्या दुसऱ्या टप्प्यात अधिकची मंजूर होऊन दुसरा टप्पा 216 पदांचा जाहीर झाला. 30 नोव्हेंबर पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.