पुणे-महापालिकेकडून खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून नेमण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षकांसाठी 45 वर्षे वय पेक्षा कमी वयाची अट बंधनकारक केली आहे. त्यामुळे महापालिकेत खासगी सुरक्षारक्षक म्हणून सेवा केलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने खासगी सुरक्षारक्षकांनी सोमवारी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या सुरक्षारक्षकांनी कोविड काळात जिवाची पर्वा न करता काम केले आहे. महापालिकेच्या एका निर्णयामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संजय गवळी, विभाग संघटक करूणा घाडगे, शाखा संघटिका कल्याणी पवार यावेळी उपस्थित होत्या.