राजगुरूनगर – बुट्टेवाडी (ता. खेड) येथे रोकडोबा देवाच्या यात्रेनिमित्ताने आयोजित चार दिवसीय बैलगाडा शर्यतीमध्ये 810 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन व घाटाचे पूजन सातकरस्थळ ग्रामपंचातीचे माजी सरपंच अजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
चार दिवस चाललेल्या बैलगाडा अंतिम शर्यतीमध्ये पहिल्या दिवसाचा प्रथम क्रमांक गणेश दत्तात्रय वाळुंज, दुसऱ्या दिवसाचा प्रथम क्रमांक सुनील निवृत्ती पठारे, तिसऱ्या दिवसाचा प्रथम क्रमांक महेश किसन लांडगे, चौथ्या दिवशीचा प्रथम क्रमांक बबन विठोबा पडवळ यांच्या बैलगाड्याने मिळवला. बैलगाडा घाट सुरू असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, संदीप घनवट, राहुल गोरे, मयूर मोहिते, मृण्मय काळे आदींनी भेटी दिल्या.
यात्रेचे नियोजन ऍड. संतोष तळेकर, ऍड. प्रकाश तळेकर, बाळशिराम पोळ, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतीश तळेकर, सरपंच दत्तात्रय ठाकर, माजी सरपंच माऊली तळेकर, भगवान गाढवे, महेंद्र गाढवे, संपत मेदगे, बबन तळेकर, दिलीप तळेकर, सुमंत तळेकर, सागर तळेकर,गणेश तळेकर आदींसह ग्रामस्थानी केले.