सराफाला लूटणारा फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

Madhuvan

पुणे- सराफी व्यावसायकाला लुटणाऱ्या फरार सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविंद्र उर्फ बल्ली वसंत कांबळे (32 रा. गुलटेकडी मार्केटयार्ड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत कांबळे याने एका व्यापाऱ्याला लुटले होते. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो अनेक दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

दरम्यान हद्दीत गस्तीवर असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाये, कर्मचारी ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांना बातमी मिळाली होती की, सराफी व्यापाऱ्याला लुटणारा फरार सराईत कांबळे हा डायसप्लॉट कॅनोल गुलटेकडी येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधीक चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी त्याला विश्रामबाग पोलिसांच्यता ताब्यात देण्यात आले आहे. कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी अशा स्वरुपाचे गुन्हे स्वारगेट, सहकारनगर व इतर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.